चाणक्य यांनीच जनपदांमध्ये विभागलेल्या देशाला एकत्र आणले आणि अखंड भारताची निर्मिती केली. त्यांच्या नीती आजही आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या एका नीतीमध्ये अशा ४ कामांबद्दल सांगितले आहे, जी केल्यानंतर लगेच स्नान करणे आवश्यक आहे. पुढे जाणून घ्या कोणती आहेत ती ४ कामं…
स्त्रीसंग म्हणजेच कामक्रिया केल्यानंतर स्नान करणे खूप आवश्यक आहे. हा नियम स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही समान आहे. याचे विशेष लक्ष ठेवावे.
केस कापल्यानंतर किंवा शेव्हिंग केल्यानंतरही लगेच स्नान करून घ्यावे. केस कापल्यानंतर संपूर्ण शरीरावर लहान-लहान केस चिकटतात जे स्नान केल्यानंतरच शरीरावरून निघून जातात.
आचार्य चाणक्य यांच्या मते, तेल मालिश केल्यानंतर लगेच स्नान करणे आवश्यक आहे. असे केल्याने त्वचारोग होण्याची शक्यता वाढते. म्हणून तेल मालिश केल्यानंतर लगेच स्नान करा.
जेव्हा आपण एखाद्याच्या शवयात्रेत स्मशानभूमीला जातो तेव्हा आपले शरीर अशुद्ध होते. म्हणून शवयात्रेतून परतल्यानंतर स्नान करणे खूप आवश्यक मानले जाते.