BSNLने 5G नेटवर्कची चाचणी सुरू केली आहे. ही चाचणी भारतात 5G नेटवर्कच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ह्या 5G नेटवर्क चाचणीमुळे इतर दुरसंचार कंपन्यांची चिंता वाढणार आहे.
BSNLने चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस 1 लाख 4G साइट्स सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या 5G नेटवर्कनंतर BSNLची चाचणी स्पर्धेला आणणार आहे.
केंद्र सरकार BSNLला लवकर नफ्यात आणण्याच्या प्रयत्नात आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (CDOT) सोबत 5G नेटवर्कची चाचणी घेतली जात आहे.
BSNL नंतर रिलायन्स जिओ ही स्वदेशी नेटवर्कचा वापर करणारी दुसरी कंपनी असेल. 5G साठी CDOT ने उपलब्ध करून दिलेले नेटवर्क कोर वापरले जात आहे.
BSNLने 'BSNL लाइव्ह टीव्ही' अॅप्लिकेशन लॉन्च केले आहे. हे अॅप सुरुवातीला अँड्रॉइड टीव्हीसाठी उपलब्ध आहे आणि गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल.
BSNLने फेब्रुवारी 2024 मध्ये IPTV सेवा सुरू केली आहे. सुरुवातीचा दर 130 रुपये प्रति महिना आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलसारख्या कंपन्यांसोबत स्पर्धा.
BSNLला 4G नेटवर्कसाठी केंद्र सरकारकडून 6000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि मुंबईतील BSNL आणि MTNLला 3.22 लाख कोटी रुपये मिळाले आहेत.
BSNLच्या 4G नेटवर्कसाठी उपकरणे खरेदी करण्याची ऑर्डर टीसीएस आणि आयटीआयला देण्यात आली आहे. हा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.