Marathi

एकही फूल गळणार नाही! लिंबाच्या झाडासाठी वापरा हा जबरदस्त उपाय

घरातल्या कुंडीत लावलेल्या लिंबाच्या झाडाला भरपूर फुलं येतात, पण ती गळून पडतात. ही समस्या अनेकांना येते. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही ही फुलगळ थांबवू शकता.
Marathi

पाणी योग्य प्रमाणात द्या

लिंबाच्या झाडाला खूप जास्त पाणी किंवा खूप कोरडी माती चालत नाही. कुंडीतील मातीचा वरचा थर सुकल्यावरच पाणी द्या. जास्त पाण्यामुळे झाडाची मुळं कमकुवत होतात आणि फुलं गळायला लागतात.

Image credits: chat GPT
Marathi

पोटॅश आणि फॉस्फरसयुक्त खत वापरा

झाडावर फुलं टिकून राहण्यासाठी पोटॅश खूप महत्त्वाचं आहे. महिन्यातून एकदा बोनमील किंवा केळ्याच्या सालीचं पाणी झाडाला द्या. यामुळे फुलं मजबूत होतात.

Image credits: chat GPT
Marathi

भरपूर सूर्यप्रकाश मिळू द्या

लिंबाच्या झाडाला रोज किमान ५-६ तास सूर्यप्रकाशाची गरज असते. कमी उन्हामुळे झाड कमजोर होतं आणि त्याची फुलं गळू लागतात.

Image credits: chat GPT
Marathi

हलकी छाटणी करा

झाडाच्या सुकलेल्या आणि कमकुवत फांद्या कापून टाका. यामुळे झाडाची ऊर्जा निरोगी फांद्यांकडे जाते आणि फुलं जास्त काळ टिकून राहतात.

Image credits: chat GPT
Marathi

परागीभवनासाठी मदत करा

तुमची कुंडी बाल्कनीत असेल आणि तिथे मधमाश्या येत नसतील, तर एका मऊ ब्रशने फुलांवरून हलक्या हाताने फिरवा. यालाच परागीभवन (पॉलीनेशन) म्हणतात.

Image credits: chat GPT
Marathi

तापमान आणि वाऱ्यापासून बचाव करा

खूप जोराचा वारा किंवा तापमानात अचानक होणारा बदल, यामुळेही फुलं गळतात. झाडाला अशा ठिकाणी ठेवा जिथे थेट वाऱ्याचा झोत लागणार नाही.

Image credits: chat gpt

Ceramic Pot: कमी बजेटमध्ये घराला द्या स्टायलिश लुक, बाल्कनी-गार्डनसाठी 7 भारी सिरेमिक पॉट्स

Irani Chai Recipe: घट्ट-मलईदार हैद्राबादी स्टाईल चहा घरी कसा बनवायचा?

Chunky Meenakari Earrings: सोनं कमी, कलाकुसर जास्त; ट्रेंडिंग डिझाइन्स

Silver Pendant: तुमच्या टीनएज मुलीसाठी चांदीचे लॉकेट, 1 ग्रॅम वजनात पाहा 24 सुंदर डिझाइन्स