Marathi

वैभव सूर्यवंशी भारतीय संघातून लवकरच खेळणार, १५ वर्षांचा झाला बेबी हल्क

Marathi

15 वर्षांचा झाला क्रिकेटचा नवा तारा!

भारतीय युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आज 15 वर्षांचा झाला आहे. या वयातही त्याने क्रिकेटविश्वात मोठी छाप सोडली आहे. राजस्थान रॉयल्स कडून खेळताना तो आधीच चर्चेत आला आहे.

Image credits: stockPhoto
Marathi

वाढदिवस खास का ठरला?

15 वर्षे पूर्ण होताच तो आंतरराष्ट्रीय वरिष्ठ क्रिकेटसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे लवकरच टीम इंडियामध्ये संधी मिळण्याची चर्चा रंगली आहे.

Image credits: x@SDhawan25
Marathi

IPL मध्ये आधीच इतिहास

आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू म्हणून वैभवला ओळखलं जात. पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला असून अवघ्या 14 व्या वर्षी शतक पूर्ण केलं. 

Image credits: social media
Marathi

“बेबी हल्क” अशी ओळख

त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे तो भविष्यातील सुपरस्टार मानला जात आहे. त्याच्या जोरदार फटक्यांमुळे चाहत्यांनी त्याला “बेबी हल्क” हे टोपणनाव दिले आहे. 

Image credits: X@Cricsam01
Marathi

छोट्या गावातून मोठ्या मंचावर

बिहारमधील छोट्या गावातून आलेल्या या खेळाडूने प्रचंड मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तर गाठला. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्याचा प्रवास अधिक मजबूत झाला.

Image credits: stockPhoto
Marathi

टीम इंडियात एन्ट्री कधी?

वयाची अट पूर्ण झाल्याने आता सर्वांचे लक्ष त्याच्या टीम इंडियातील संभाव्य पदार्पणाकडे लागले आहे. येत्या काळात तो भारतीय क्रिकेटचा मोठा चेहरा ठरू शकतो.

Image credits: Getty

कोण आहे हि मॅजिक गर्ल, ईशान किशनच्या मिठीत गेली सामावून

अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल, नामिबियाविरुद्ध खेळण्यावर प्रश्नचिन्ह

स्मृती मंधानाचा ग्लॅमरस लूक पाहून पडाल प्रेमात, फोटो पहिले का?

2025 मध्ये विवाहबंधनात अडकलेले 5 खेळाडू, एकाचे तर लग्न मोडले