आईसीसीने महिला फलंदाजांची नवीन वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. आयर्लंडविरुद्धच्या तीन वनडेत कर्णधारपद भूषवणाऱ्या स्मृति मंधाना यांना याचा फायदा झाला आहे.
स्मृति गेल्या काही महिन्यांपासून लाजवाब कामगिरी करत आहेत. आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत त्यांनी ८० चेंडूत १३४ धावा केल्या होत्या. याचा फायदा त्यांना आता मिळाला आहे.
महिला वनडे फलंदाजांच्या यादीत स्मृति मंधानाने दुसरे स्थान पटकावले आहे. आयर्लंडविरुद्धच्या त्यांच्या शानदार कामगिरीमुळे त्यांना ICC क्रमवारीत बढती मिळाली आहे.