नीता अंबानी यांचे पती मुकेश अंबानी यांनी २००८ मध्ये आयपीएल संघ मुंबई इंडियन्स विकत घेतला. मुकेश यांनी १११.९ मिलियन डॉलर्समध्ये फ्रँचायझी आपल्या नावावर केली.
मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्सचा एक दमदार संघ बनवला, ज्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर आयपीएलच्या एकूण पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत.
मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक कार्यक्रमात नीता अंबानी आपला मुलगा आकाश अंबानी यांच्यासोबत दिसतात. दिवसेंदिवस त्यांचा संघ पुढे जात आहे.
दिवसेंदिवस मुंबई इंडियन्सची ब्रँड व्हॅल्यू वाढत चालली आहे. नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांनी संघाची ब्रँड व्हॅल्यू १२ मिलियन डॉलर्सपर्यंत नेली आहे.
गेल्या वर्षी आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने कर्णधार बनवले होते. नीता अंबानी आणि हार्दिक यांच्यात चांगले संबंध आहेत. नीता नेहमीच पांड्यांना पाठिंबा देतात.
हार्दिक पांड्या पूर्वी मुंबई इंडियन्ससाठी खेळत होते. परंतु, २०२२ आणि २३ च्या हंगामात ते जीटीसाठी खेळले. २०२४ मध्ये पुन्हा अंबानींनी त्यांना १६.३५ कोटींना रिटेन केले.
आज हार्दिक पांड्या करोडो रुपयांचे मालक आहेत. त्यांच्याकडे वृत्तानुसार ९० कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या या यशामागे अंबानींचा हात आहे.