२०२४ हे वर्ष लवकरच संपणार आहे. या वर्षी अनेक नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. क्रीडा क्षेत्रातही खेळाडू गुगलवर धुमाकूळ घालत आहेत.
आज आम्ही तुम्हाला अशा पाच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांना २०२४ मध्ये गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च केले गेले आहे. या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.
२०२४ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या खेळाडूचे नाव कुस्तीपटू विनेश फोगट आहे. कुस्तीपटूच्या आंदोलनापासून ते ऑलिम्पिकपर्यंत लोकांनी तिला खूप सर्च केले.
क्रीडा क्षेत्रात हार्दिक पांड्या हा गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा दुसरा खेळाडू आहे. हार्दिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदामुळे खूप चर्चेत होता.
क्रिकेटर शशांक सिंगचे नाव देखील २०२४ च्या सर्वात टॉप व्यक्तिमत्वात समाविष्ट आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा ॲक्शनमध्ये पंजाब किंग्जने त्याला ५.५ कोटी रुपयात खरेदी केले आहे.
भारतीय युवा क्रिकेटपटू अभिषेक शर्मालाही गुगलवर खूप सर्च करण्यात आले आहे. आयपीएल २०२४ आणि भारतीय क्रिकेट संघातील चमकदार कामगिरीनंतर या खेळाडूला लोकांनी खूप शोधले.
२०२४ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचे नाव देखील आहे. तो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठणारा पहिला भारतीय ठरला.