आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांची आयपीएल २०२४ मध्ये कमाई खूप जास्त होती. पण, आयपीएल २०२५ मध्ये त्यांना करोडोंचे नुकसान सहन करावे लागले आहे.
आयपीएल २०२५ मध्ये सर्वात मोठा तोटा इंग्लंडचा खेळाडू सॅम कुरनचा झाला. गेल्या मोसमात पंजाबसाठी १८.५० कोटी रुपये आकारणाऱ्या सॅम कुरनला सीएसकेने केवळ २.४० कोटी रुपयांना विकत घेतले.
IPL २०२५ मध्ये केएल राहुलला नुकसानीचा सामना करावा लागला. गेल्यावेळी लखनौ सुपर जायंट्सने त्याला १७ कोटी रुपये दिले होते. पण, यावेळी दिल्ली संघाने त्याला १४ कोटी रुपयांना विकत घेतले.
आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या इशान किशनचा पगार १५.२५ कोटी रुपये होता. पण, त्याला सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२५ साठी ११.२५ कोटी रुपयांना विकत घेतले.
आयपीएल २०२४ मध्ये ग्लेन मॅक्सवेलचा पगार ११ कोटी रुपये होता. आरसीबीने त्याला आयपीएल २०२५ साठी रिटेन केले नाही आणि पंजाबने त्याला ४.२० कोटी रुपयांना खरेदी केले.
मिचेल मार्श आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून ६.२५ कोटी रुपयांमध्ये खेळत होता. आयपीएल २०२५ मध्ये लखनऊने त्याला ३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले.
समीर रिझवीसाठी आयपीएल २०२५ मेगा लिलाव फायदेशीर ठरला नाही. सीएसकेकडून ८.४० कोटी रुपयांना आयपीएल २०२४ खेळणाऱ्या या खेळाडूला दिल्लीने ९५ लाख रुपयांना विकत घेतले.