क्रिकेट आणि ग्लॅमरस जगाचा संबंध खूप खास राहिला आहे. असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी हिरोईनशी लग्न केले आहे. मात्र, काही खेळाडू क्रीडा पत्रकारांच्या प्रेमातही पडले आहेत.
आज या स्टोरीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच पाच क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी क्रीडा पत्रकारांशी लग्न केले आहे. या यादीतही मोठी नावे आहेत.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनसोबत लग्न केले आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे ज्याचे नाव त्यांनी अंगद ठेवले आहे.
न्यूझीलंडचा माजी खेळाडू मार्टिन गुप्टिलने स्पोर्ट्स अँकर लॉरा मॅकगोड्रिरक सोबत लग्न केले आहे. दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले. दोघांची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली.
भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीने स्पोर्ट्स अँकर मयंती लँगरसोबत लग्न केले आहे. दोघांनी २०१२ साली लग्न केले. स्टुअर्ट बिन्नी हा बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा मुलगा आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉटसनने ली फॉरलाँगसोबत लग्न केले. ती एक क्रीडा पत्रकार आहे. दोघे २००६ मध्ये भेटले आणि २०१० मध्ये लग्न केले.
सध्या भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलने ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध क्रीडा अँकर रोझ केली हिच्याशी लग्न केले आहे. दोघांची पहिली भेट २०१२ मध्ये झाली होती.