भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज मिचेल स्टार्क हे दोघेही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जातात. या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे ते जाणून घेऊया
जसप्रीत बुमराह हा भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा मानला जातो. आतापर्यंत त्याने ४२ सामन्यांच्या ८१ डावांत १८५ बळी घेतले आहेत.
मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज आहे. स्टार्कने ९१ कसोटी सामन्यांच्या १७४ डावात आपल्या संघासाठी ३६९ विकेट्स घेतल्या आहेत.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या गोलंदाजीदरम्यान खूप किफायतशीर ठरतो. कसोटीत त्याची इकोनॉमी आतापर्यंत २.७५ आहे.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्टार्कनेही कसोटी क्रिकेटमध्ये अत्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. त्याची इकोनॉमी आतापर्यंत ३.४२ आहे.
बुमराहने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत ११ वेळा पाच बळी घेतले आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरीही १९.९६ इतकी आहे. त्याच्याविरुद्ध फलंदाजी करणे फलंदाजांसाठी खूप कठीण जाते.
सर्वाधिक पाच विकेट घेण्याच्या बाबतीत मिचेल स्टार्क बुमराहच्या पुढे आहे. त्याने १५ वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. मात्र, त्याची सरासरी २७.५४ आहे.