आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी 2025 मध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले असून, ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे.
आज आम्ही तुम्हाला ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या पाच भारतीय फलंदाजांबद्दल सांगणार आहोत.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे. त्याने 13 सामन्यात 17 षटकार मारले आहेत.
या यादीत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुसऱ्या स्थानावर आहे. हार्दिकने पाच सामने खेळले असून त्यात १० षटकार मारले आहेत.
या विक्रमांच्या यादीत माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवननेही आपले स्थान निर्माण केले आहे. या डावखुऱ्या खेळाडूने 10 सामन्यात आठ षटकार मारले आहेत.
या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितने 2013 आणि 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली होती आणि 10 सामन्यांमध्ये 8 षटकार मारले होते.
विराट कोहली 2009, 2013 आणि 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला आहे. या स्पर्धेत एकूण 13 सामने खेळल्यानंतर कोहलीने 8 षटकार ठोकले आहेत.