भारत आणि ऑस्ट्रेलिया लढतीला ब्रिस्बेन येथे सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये दोनही संघामध्ये मोठी लढत होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ब्रिस्बेन येथील स्टेडियम पूर्णपणे प्रेक्षकांनी भरलेले आहे. येथे पाऊस आल्यामुळे प्रेक्षकांचा मूड ऑफ झाला असला तरी येथे प्रेक्षक मोठ्या संख्येने भरला आहे.
सारा तेंडुलकर भारतीय संघाला पाठींबा देण्यासाठी ब्रिस्बेन येथे जाऊन पोहचली आहे. तिने स्वतः याबद्दलची माहिती दिली आहे.
इंस्टाग्रामवर सारा हिने स्टोरी अपडेट करून याबाबतची माहिती दिली आहे. सारा गाबा येथील मैदानावर आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी पोहचली आहे.
सारा तेंडुलकरने मैदानाबाहेरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने त्या फोटोवर गुड मॉर्निंग ब्रिस्बेन असं लिहिलं आहे.
विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह याची पत्नी या ठिकाणी मॅच पाहायला पोहचली आहे. या दोघीही भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी आल्या आहेत.
ब्रेकफास्टचा सारा तेंडुलकरने फोटो शेअर केला आहे. सारा तेंडुलकरचे नाव शुभमन गिल सोबत कायमच जोडले जात असते.