Marathi

IIT Bombayच्या एमबीए प्रवेशासाठी नॉन-इंजिनीअर्सलाही मिळणार संधी

Marathi

कोणता बदल करण्यात आला?

आयआयटी मुंबईच्याएमबीए प्रवेशासाठी पात्रता निकषांमध्ये बदल करत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नॉन-इंजिनीअर्स देखील एमबीए अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतील.

Image credits: Getty
Marathi

कोण अर्ज करू शकणार?

आधीपर्यंत केवळ इंजिनीअरिंग पदवीधारकांनाच आयआयटी मुंबईच्या एमबीएसाठी पात्र मानलं जात होतं. मात्र, नव्या निकषांनुसार आता कोणत्याही शाखेतील पदवीधर या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतील.

Image credits: Getty
Marathi

CAT स्कोअर महत्त्वाचा

पात्रतेसाठी उमेदवारांनी कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (CAT) दिलेली असावी आणि चांगला स्कोअर मिळालेला असावा. या प्रवेशप्रक्रियेसाठी CAT स्कोअर, वैयक्तिक मुलाखत मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत.

Image credits: social media
Marathi

यामागचं उद्दिष्ट काय आहे?

या निर्णयामागील उद्देश म्हणजे एमबीएच्या वर्गात वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असावेत, जेणेकरून कॉर्पोरेट जगात विविध दृष्टिकोनातून निर्णय घेणाऱ्या नेतृत्व तयार होईल.

Image credits: Getty
Marathi

सर्व समावेशक दृष्टीकोन तयार होणार

SJMSOM चे प्रमुख प्रा. सुर्या ड्विवेदी यांनी सांगितले की, “या निर्णयामुळे आमच्या एमबीए प्रोग्राममध्ये अधिक समतोल आणि सर्व समावेशक दृष्टीकोन तयार होईल.”

Image credits: Getty
Marathi

निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार?

हा बदल २०२५-२७ या शैक्षणिक सत्रापासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे नॉन-इंजिनीअर विद्यार्थ्यांनाही आयआयटी मुंबईत एमबीए करण्याची संधी मिळणार आहे.

Image credits: Getty

आज रविवारी मुंबईत 100 रुपयांत फिरण्याची Top 10 ठिकाणे, एकदा नक्की भेट द्या

कोण होते करीम भाई इब्राहिम, दान दिलेल्या जमिनीवर उभा आहे अंबानींचा हवामहल

मुंबईच्या पहिल्या महिला गुप्तवार्ता प्रमुख डॉ. आरती सिंह, खबरींचे जाळे करणार मजबुत

मुंबईतील पहिला 'फॉरेस्ट वॉकवे', निसर्गाच्या गोड अनुभूतीसाठी!