मुंबईतील मरीन ड्राइव्हवर बसून सुर्यास्ताचा आनंद लुटण्याचा अनुभव वेगळाच आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी मरीन लाइन्स स्टेशनला उतरावे लागेल.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
हँगिग गार्डन
मलबार हिल्स येथील हँगिग गार्डनला तुम्ही १०० रुपयांत भेट देऊ शकता. या गार्डनमध्ये प्रवेश विनामूल्य असून वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे येथे पहायला मिळतील.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
ताज हॉटेल
गेटवे ऑफ इंडियाच्या समोर असलेल्या मुंबईतील प्रतिष्ठित ताज हॉटेलला भेट देऊ शकता. ताजच्या समोरच्या समुद्राचा आनंद घेऊ शकता. येथे पोहोचण्यासाठी सीएसएमटी स्थानकात उतरावे लागेल.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
जुहू बीच
जुहू बीचवर सकाळी किंवा संध्याकाळी नागरिकांची गर्दी असते. जुहू बीचवर मिळणाऱ्या चौपाटी स्नॅक्सचा आनंद घेण्यासाठी अनेकजण येतात.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
राणी बाग
भायखळा येथील राणी बाग म्हणजेच वीर जिजामाता उद्यानाला १०० रुपयांत भेट देता येते. येथील वाघ, सिंह, हत्ती आणि पेंग्विन पाहण्यासाठी मुलांना नक्की घेऊन जा.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
तारापोरवाला मत्सालय
मरीन ड्राइव्हजवळील तारापोरवाला मत्सालयाला १०० रुपयांत भेट देता येते. येथे वेगवेगळ्या प्रजातींचे मासे पहायला मिळतील.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
वांद्रे फोर्ट
मुंबईतील वांद्रे फोर्ट आणि येथून दिसणारा वरळी सी-लिंकचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. या ठिकाणी भेट देण्यासाठी वांद्रे स्थानकात उतरावे लागेल.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
कुलाबा कॉजवे
गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेलला भेट दिल्यानंतर खरेदीसाठी कुलाबा कॉजवेला भेट द्या. येथे ट्रेन्डी आणि फॅशनेबल कपडे आणि दागिने खरेदी करता येतील.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मित्रपरिवारासोबत भेट देता येते. येथे प्रवेशासाठी शुल्क भरावे लागते. उद्यानाच्या वर कान्हेरी लेणी आहेत.
Image credits: सोशल मीडिया
Marathi
प्रियदर्शनी पार्क
नेपन्सी रोडवरील समुद्रकिनारी असलेल्या प्रियदर्शनी पार्कला भेट देता येते. येथून दिसणारा सूर्यास्त पाहण्याजोगा असतो.