दुधीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यापासून वेगवेगळे पदार्थही तयार केले जातात. जाणून घेऊया दुधीच्या खीरची सोपी रेसिपी
दुधी– 2 कप ( किसलेली), दूध- 500 मिली, तूप- 2 मोठे चमचे, साखर- 1/2 कप, वेलची पूड- 1/2 छोटा चमचा, ड्रायफ्रूट्स आणि केशर
दुधीची साल आणि बिया काढा आणि नंतर किसून घ्या. आता ते हलक्या हाताने पिळून घ्या जेणेकरून अतिरिक्त पाणी निघून जाईल.
एक पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यात किसलेली दुधी घालून मध्यम आचेवर 7-8 मिनिटे परतून घ्या.
पॅनमधील मिश्रणात दूध घाला आणि मध्यम आचेवर शिजू द्या. जोपर्यंत दूध थोडे घट्ट होत नाही आणि दुधी शिवजवून घ्या.
दुधीच्या मिश्रणात साखर घालून ढवळून घ्या. 5-6 मिनिटांनी खीरच्या मिश्रणात वेलची पूड घाला.
खीर व्यवस्थितीत शिजल्यावर त्यावरुन ड्राय फ्रुट्स घालून पाहुण्यांना खाण्यासाठी सर्व्ह करा.
गोल्डन साडीवर ट्राय करा हे 5 कॉन्ट्रास्ट ब्लाउज, खुलेल सौंदर्य
Chanakya Niti: अशा 7 स्वभावांच्या लोकांपासून लांब रहा
घरच्याघरी मिल्क शेक पटकन कसा बनवावा?
रॉयल लूकसाठी 100 रुपयांत खरेदी करा या डिझाइन्सचे Nose Rings