व्हॅनिला आईस्क्रीम – ३ स्कूप (सुमारे १.५ कप), थंड दूध – १ कप, व्हॅनिला अर्क – १/२ टीस्पून (ऐच्छिक), साखर – १ ते २ टेबलस्पून (चवीनुसार), बर्फाचे तुकडे – काही (ऐच्छिक)
Image credits: Freepik
Marathi
तयारी
सर्व साहित्य तयार ठेवा. दूध पूर्ण थंड असावं. आईस्क्रीमही थोडं कडक असलेलं चांगलं लागतं. साखर तुमच्या चवीनुसार घालायची आहे. जर आईस्क्रीम गोड असेल तर कमी साखरही चालेल.
Image credits: Freepik
Marathi
मिक्सिंग
मिक्सरच्या जारमध्ये प्रथम थंड दूध ओता. त्यात व्हॅनिला आईस्क्रीमचे स्कूप घाला. साखर आणि हवे असल्यास व्हॅनिला अर्क घाला.
Image credits: Freepik
Marathi
ब्लेंड करा
आता मिक्सर झाकण लावून ३०-४० सेकंद गुळगुळीत होईपर्यंत फिरवा. शेक हलका झाकट आणि फेसाळसर दिसेल – याचं टेस्चर परफेक्ट आहे.
Image credits: freepik
Marathi
सर्व्हिंग
एका उंच ग्लासमध्ये मिल्कशेक ओता. वरून हवे असल्यास व्हीप्ड क्रीम, चॉकलेट सिरप, किंवा रंगीत स्प्रिंकल्स घालून सजवा. थोडा ड्रायफ्रूट्स पावडरही छान लागतो.