रस्त्यावरुन पायी चालताना काही गोष्टींपासून दूर राहून चालावे. खरंतर, काही अशा गोष्टी आहेत ज्यावर पाय ठेवून चालल्याने समस्या उद्भवू शकते. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर...
शास्रांनुसार, डोक्याचे केस अपवित्र असल्याचे मानले जाते. हे केस कोणत्याही जनावर किंवा व्यक्तीचेही असू शकतात. जर रस्त्यावर केस पडले असल्यास त्यापासून दूर व्हा.
नजर काढणे किंवा वाईट उर्जांपासून दूर राहण्यासाठी बहुतांशजण लिंबू-मिरची, अंडी, भोपला अथवा लाल सिंदूरचा वापर केला जातो. कधीच अशा वस्तूंवर पाय ठेवू नका.
रस्त्यावर पाणी पडले असल्यास त्यापासून दूर राहून चालावे. याचा स्पर्श शरिराला होऊ देऊ नका.
रस्त्यावरुन चालताना जनावरांचे हाडं किंवा मास पडलेले दिसते. अशा गोष्टी रस्त्यात चालताना दिसल्यास तेथून दूर व्हावे. याचा आपल्या शरिराला स्पर्श होऊ देऊ नका.
रस्त्यावर एखादे फाटलेले आणि जुने कपडे दिसल्यास त्यापासून दूर राहून चालावे. असे कपडे तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.