गव्हाच्या पीठापासून 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पकोडे, वाचा रेसिपी
Lifestyle Feb 03 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
गव्हाच्या पीठाचे पको़डे
गव्हाच्या पीठाचा वेगवेगळ्या रेसिपीसाठी वापर केला जातो. पण संध्याकाळच्या नाश्तासाठी गव्हाच्या पीठाचे पकोडे कधी तयार केलेत का? याचीच रेसिपी पुढे सविस्तर पाहूया...
Image credits: social media
Marathi
सामग्री
एक कप गव्हाचे पीठ
चवीनुसार मीठ
हिरवी मिरची
कोथिंबीर
एक चमचा जीरे
दोन टिस्पून तेल
अर्धा चमचा हळद
Image credits: social media
Marathi
गव्हाच्या पीठाचे बॅटर तयार करा
सर्वप्रथम गव्हाचे पीठ एका भांड्यात घेऊन त्यामध्ये जीरे, हळद आणि पाणी घालून घट्ट बॅटर तयार करा.
Image credits: social media
Marathi
कोथिंबीर बारीक चिरून घ्या
कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून एका वाटीत काढून ठेवा. यानंतर पीठाच्या बॅटरमध्ये मीठ, चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालून घ्या. यानंतर पुन्हा एकदा बॅटर व्यवस्थितीत मिक्स करा.
Image credits: freepik
Marathi
पकोडे तळून घ्या
गॅसवर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर हाताने बॅटर किंवा चमच्याच्या मदतीने गोलाकार आकारात तेलात सोडा.
Image credits: Social media
Marathi
पकोडे टिश्यू पेपरवर काढा
गव्हाच्या पीठाचे पकोडे मध्यम आचेवर तळून घ्या. यानंतर टिश्यू पेपरवर काढून ठेवा. जेणेकरुन पकोड्यांमधील अत्याधिक तेल निघून जाईल.
Image credits: Social Media
Marathi
चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा
प्लेटमध्ये गव्हाचे पकोडे हिरवी चटणी किंवा सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.