Marathi

उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी काय करायला हवं, जाणून घ्या

Marathi

भरपूर पाणी प्या

दिवसाला किमान ८-१० ग्लास पाणी प्या. जर जास्त घाम येत असेल, तर १-२ ग्लास अधिक पाणी घ्या. बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवा.

Image credits: Freepik
Marathi

नैसर्गिक आणि हायड्रेटिंग पेयांचा समावेश करा

नारळपाणी घेतल्यास शरीरात इलेकट्रोलाईट संतुलित राहतं. ताक पिल्यावर शरीर थंड राहून पचन सुधारत जातं. उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी उत्तम राहतं. 

Image credits: Freepik
Marathi

पाणीयुक्त पदार्थ खा

कलिंगड, काकडी, संत्री, द्राक्षे, टोमॅटो, पपई, स्ट्रॉबेरी, नारळ यांसारखी पाणीयुक्त फळे व भाज्या खा. गोड, तळलेले आणि जड पदार्थ टाळा, कारण ते शरीरात उष्णता वाढवतात.

Image credits: Freepik
Marathi

उन्हापासून बचाव करा

दुपारी १२ ते ३ वाजताच्या दरम्यान उन्हात जाणे शक्यतो टाळा. बाहेर पडताना हलके आणि सुटसुटीत सुती कपडे घाला. टोपी, गॉगल आणि छत्रीचा वापर करा.

Image credits: Freepik
Marathi

चहा आणि कॉफी कमी करा

कॅफिनयुक्त पदार्थ (चहा, कॉफी, सोडा, अल्कोहोल) टाळा, कारण ते शरीरातील पाणी कमी करतात. त्याऐवजी हर्बल टी किंवा ग्रीन टी घेऊ शकता.

Image credits: Freepik
Marathi

शरीरातील मीठ आणि इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवा

घामामुळे शरीरातील सोडियम, पोटॅशियम आणि मिनरल्स कमी होतात, त्यामुळे ORS (ओआरएस), लिंबूपाणी, साखर-मीठ पाणी यांचा आहारात समावेश करा.

Image credits: Freepik

उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी?

पुण्यात प्रसिद्ध लस्सी कोठे मिळते, ठिकाण जाणून घ्या

Chanakya Niti: सुरू होणार आहे तुमचा वाईट काळ, सांगतात हे 5 संकेत

45+ वयातही नाही ढळणार तरुणपण! श्वेता तिवारीसारखी साडी घालून रहा तरुण