दिवसातून २-३ वेळा हलक्या फेसवॉशने चेहरा धुवा. तेलकट त्वचेसाठी सालीसिलिक अॅसिड असलेला फेसवॉश वापरा. कोरड्या त्वचेसाठी माइल्ड क्लींझर किंवा गुलाबपाणी चांगले आहे.
Image credits: Social Media
Marathi
सनस्क्रीन लावणे अनिवार्य
घराबाहेर पडण्याआधी SPF 30+ किंवा 50+ असलेला सनस्क्रीन लावा. प्रत्येक ३-४ तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावा. चेहऱ्याच्या सोबत मान आणि हातांवरही सनस्क्रीन लावा.
Image credits: pinterest
Marathi
त्वचेला हायड्रेट ठेवा
दररोज ८-१० ग्लास पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा. फळांचे रस, नारळपाणी, ताक यांचा आहारात समावेश करा. त्वचेसाठी आवळा, कलिंगड, काकडी, पपई आणि संत्री फायदेशीर आहेत.
Image credits: pinterest
Marathi
हलके आणि नैसर्गिक मेकअप वापरा
उन्हाळ्यात जड मेकअप टाळा, कारण त्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट होते. BB क्रीम किंवा जेल-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. चेहऱ्यावर सतत हात लावणे टाळा.
Image credits: pinterest
Marathi
रात्री त्वचेची काळजी घ्या
झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून हलका मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून २ वेळा स्क्रब करून मृत पेशी काढून टाका. सतत उन्हात राहावे लागत असेल, तर रात्री एलोवेरा जेल लावा.
Image credits: pinterest
Marathi
उन्हाळ्यात निरोगी आणि तजेलदार त्वचेसाठी हे करा
भरपूर पाणी प्या. सनस्क्रीन वापरा. तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमी खा. नैसर्गिक फेसपॅक आणि मॉइश्चरायझर वापरा.