कोरडी त्वचा ही फाटण्यामागचं मुख्य कारण असतं. कोको बटर, शीया बटर, ग्लिसरीन किंवा नारळाचं तेल वापरावं. दरवेळी अंघोळीनंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावणं आवश्यक आहे.
खूप गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकतं, ज्यामुळे त्वचा अजून कोरडी आणि फाटते.
दिवसातून किमान ८–१० ग्लास पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास त्वचा कोरडी आणि नाजूक होते.
रात्री झोपण्यापूर्वी नारळाचं तेल, बदाम तेल, किंवा तूप लावा. अॅलोव्हेरा जेल वापरल्यास थंडावा मिळतो आणि त्वचेला आराम मिळतो. हळद आणि तुपाचा लेप लावल्यास बरेच फायदे होतात.
फाटलेल्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावून, त्यावर कापसाचे मोजे किंवा हातमोजे घालून झोपा. यामुळे त्वचेला उपचारासाठी वेळ मिळतो.
हार्श केमिकल्स असलेले साबण टाळा. सॉफ्ट, स्किन pH balance राखणारे साबण वापरा.
जर त्वचा इतकी फाटली की रक्त येत असेल, दुखत असेल किंवा इन्फेक्शन झालं असेल – तर त्वचारोगतज्ञांचा सल्ला घ्या.
त्वचा फाटली असली तरी योग्य काळजी घेतल्यास ती सहज बरी होते. नियमित मॉइश्चरायझर, घरगुती उपाय आणि भरपूर पाणी पिणं हे सोपे उपाय खूप प्रभावी ठरतात.