ताजं फळं, भाज्या, आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. तेलकट, तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. साखर आणि पांढऱ्या मैद्याचा वापर कमी करा. दिवसातून 4-5 वेळा थोडं-थोडं खा.
दररोज 30-45 मिनिटं चालणं, पळणं, सायकलिंग, योगा किंवा झुंबा. वजन कमी करण्यासाठी कार्डिओ व्यायाम खूप उपयोगी ठरतो. आठवड्यातून 1-2 दिवस स्ट्रेचिंग आणि विश्रांती घ्या
तणाव वाढल्यावर खाण्याची सवय (emotional eating) होते. ध्यान, योगासन, छंद यामुळे मन शांत राहतं.
दररोज 7-8 तासांची शांत झोप आवश्यक आहे. अपुरी झोप हार्मोनल असंतुलन निर्माण करते, ज्यामुळे भूक वाढते.
दिवसातून ८–१० ग्लास पाणी प्या. जेवणाआधी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने भूक नियंत्रित होते.
तुमचं वजन, माप, डाएट, आणि व्यायामाची नोंद ठेवा. यामुळे प्रेरणा टिकून राहते आणि चुका समजतात.
खूप कमी खाणं किंवा फक्त सूप-डाएट्स केल्याने वजन घसरतं पण परत वाढतंही पटकन