तब्येत कमी करण्यासाठी व्यायाम केल्यानंतर काय करायला हवं?
Lifestyle Mar 01 2025
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
स्ट्रेचिंग करा
व्यायामानंतर स्नायूंमध्ये ताठरता येऊ शकते, त्यामुळे हलक्या स्ट्रेचिंगने शरीर रिलॅक्स होते. रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू दुखणे कमी होते.
Image credits: social media
Marathi
भरपूर पाणी प्या
घामाच्या स्वरूपात शरीरातून पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात, त्यामुळे हायड्रेशन आवश्यक आहे. खोबरेल पाणी किंवा लिंबूपाणी घेतल्यास शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते.
Image credits: social media
Marathi
प्रोटीनयुक्त आहार घ्या
स्नायूंची दुरुस्ती आणि मजबुतीसाठी प्रथिनयुक्त आहार खाणे गरजेचे आहे. उकडलेली अंडी, दही, भिजवलेले बदाम, मूग, चिकन किंवा टोफू हे उत्तम पर्याय आहेत.
Image credits: social media
Marathi
भरपूर आराम घ्या
शरीराची पुनर्बांधणी आणि स्नायूंची वाढ झोपेमुळे होते. दररोज ७-८ तासांची गाढ झोप घेणे गरजेचे आहे.
Image credits: FREEPIK
Marathi
फळे आणि फायबर्स असलेले पदार्थ खा
केळी, सफरचंद, पपई, संत्री यासारखी फळे खाल्ल्यास ऊर्जा मिळते आणि पचन सुधारते. फायबरयुक्त आहारामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
Image credits: FREEPIK
Marathi
शरीरावर ताण आणू नका
व्यायामानंतर लगेचच जड कामे करू नका. हलक्या चालण्याने किंवा योगासनांनी शरीराला स्थिरता द्या.