नॉनव्हेज पदार्थ पचायला जड असतात, त्यामुळे अपचन, अॅसिडिटी आणि गॅस होऊ शकतो. विशेषतः तळलेले किंवा तिखट मटण, चिकन, मासे खाल्ल्यास समस्या वाढू शकते.
मटण, अंडी, मसालेदार चिकन यामुळे शरीराचे तापमान वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात चक्कर येणे, अंगात जळजळ होणे आणि त्वचेवर पुरळ उठणे शक्य आहे.
नॉनव्हेजमध्ये प्रोटीन आणि चरबीचे प्रमाण जास्त असल्याने पचनासाठी जास्त पाणी लागते. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते.
तिखट, तेलकट आणि मसालेदार नॉनव्हेज खाल्ल्यास अॅसिडिटी वाढते. त्यामुळे छातीत जळजळ, गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या आणि उलट्या होऊ शकतात.
शरीरातील उष्णता वाढल्यामुळे काही लोकांना पुरळ, फोड, पिंपल्स येण्याची शक्यता असते. विशेषतः मसालेदार नॉनव्हेजमुळे हा त्रास जास्त होतो.
रेड मीट (मटण, बीफ, पोर्क) खाल्ल्यास कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब वाढू शकतो. उन्हाळ्यात शरीरावर अधिक ताण पडतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंग पडल्यावर काय करावं?
सिंपल आणि सोबर लूक देणाऱ्या 5 Hair Style, नक्की ट्राय करा
Weight Loss करण्यासाठी प्या हे 6 हेल्दी सूप्स, आरोग्यही राखले जाईल
बॉलिवूड अभिनेत्रींच्या Gold Jewellery डिझाइन्स, लग्नसोहळ्यात खुलेल लूक