गरम ताप असेल, तर ओल्या कापडानं कपाळ, मान, हातपाय पुसणं हा पारंपरिक आणि प्रभावी उपाय आहे. यामुळे शरीराचं तापमान कमी करण्यात मदत होते.
तापात शरीराला डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोमट पाणी, लिंबूपाणी, नारळपाणी, सूप यांचा जास्त प्रमाणात सेवन करावं.
तुळशी, आलं, दालचिनी, मिरी आणि लवंग एकत्र उकळून तयार केलेला काढा दिवसातून दोन वेळा घ्यावा. यामुळे ताप कमी होण्यास आणि शरीर बळकट होण्यास मदत होते.
कोमट दूधात अर्धा चमचा हळद घालून रात्री झोपण्यापूर्वी प्यावं. हळद हे नैसर्गिक अँटीबायोटिक असून तापावर उपयोगी ठरतं.
लिंबूपाणीमध्ये ग्लुकोज किंवा मध घालून प्यायल्यास शरीरातली शक्ती टिकते आणि डिहायड्रेशनही होत नाही.
तापात शरीराला विश्रांती फार गरजेची असते. शरीराचे तापमान वाढलेलं असताना काम, थकवा किंवा मोबाईल-टीव्ही यांचा वापर टाळा. शांत झोप घेणं अधिक फायदेशीर.
Immune system: सर्दी होऊ नये म्हणून रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी?
साडीत तान्या मानिकतलासारखी हेअरस्टाईल करा, श्रावणात दिसाल अप्रतिम!
छोटी मान लांब दिसेल, स्टाइल करा आलिया भट्टच्या ५ ब्लाउज डिझाईन्स
पावसाळ्यात सर्दी, खोकला झाल्यावर घरगुती कोणते उपाय करावेत?