मार्केटमध्ये थ्रेड वर्क केलेले वेगवेगळ्या डिझाइनचे सूट खरेदी करता येतील. सध्या थ्रेड वर्क सूटचा ट्रेण्ड आहे. तुम्ही थ्रेड वर्क सूट शिवून देखील घेऊ शकता.
आजकाल दोरी असणारा अंगरखा स्टाइल कॉटन सूट बहुतांश महिला आवडीने परिधान करतात. यामध्ये सिंपल आणि सोबर लुक दिसतो.
फॅन्सी लुकसाठी नेकलाइवर पॅच वर्क करण्यात आलेला सूट उन्हाळ्यात परिधान करण्यासाठी बेस्ट पर्याय आहे. अशाप्रकारचा सूट परिधान केल्यानंतर कंम्फर्टेबलही वाटेल.
उन्हाळ्याच्या दिवसात प्रिंटेड फ्लोरल डिझाइन सूट आवर्जून परिधान केला जातो. यामुळे लुकही अधिक खुलला जातो. अशाप्रकारचा सूट मार्केटमध्ये 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
कॉटन अनारकली स्टाइमधील सूट मार्केटमध्ये दीड हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. यामध्ये फ्रॉक स्टाइल, शॉर्ट कुर्ता अथवा लॉन्ग फ्लोरलेंथ असे डिझाइन पाहायला मिळतील.
सिंपल आणि फॅन्सी लुकसाठी मार्केटमध्ये कॉनट नीलेंथ सलवार कमीजचे वेगवेगळ्या डिझाइन्स पाहायला मिळतील. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील दुपट्टा घेऊ शकता.