२ कप गव्हाचे पीठ, १/२ चमचा मीठ, १ चमचा तेल, आवश्यकतेनुसार पाणी
१ कप किसलेले पनीर, १ हिरवी मिरची, १/२ चमचा लाल तिखट, १/२ चमचा धणे पूड, १/४ चमचा आमचूर पूड, १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार
गव्हाच्या पीठात मीठ आणि तेल घालून मऊसर पीठ मळून घ्या. झाकून ठेवा.
किसलेले पनीर, हिरवी मिरची, तिखट, धणे पूड, आमचूर पूड, कोथिंबीर आणि मीठ मिक्स करा.
छोट्या गोळ्यांमध्ये कणिक वाटून घ्या. एक गोळा लाटून त्यात पनीर मिश्रण भरा, पुन्हा बंद करून हलक्या हाताने लाटून घ्या.
तव्यावर घालून दोन्ही बाजूंनी तेल/तूप लावून गुलाबी होईपर्यंत शेकून घ्या.
गरमागरम पराठा लोणी, दही किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.