तणावपूर्ण वातावरणामुळे मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. त्यांना प्रेम, आपुलकी आणि आनंदी वातावरण द्या. यामुळे ते आजारपणातही आनंदी राहतील आणि लवकर बरे होतील.
मुलांना वेळेवर लसीकरण करा. हे त्यांना अनेक गंभीर आजारांपासून वाचवते. निरोगी भविष्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुलांना खेळ आणि शारीरिक क्रियामध्ये व्यस्त ठेवा. योगासने आणि हलका व्यायामामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढते.
मुलांना दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा. नारळाचे पाणी, सूप आणि हर्बल टी यासारख्या द्रवपदार्थांनी त्यांचे शरीर हायड्रेटेड ठेवा.
मुलांच्या आहारात हिरव्या भाज्या, फळे, धान्य, कडधान्ये, सुका मेवा यांचा समावेश करा. संत्री, पेरू आणि लिंबू यांसारखी व्हिटॅमिन सीने समृद्ध फळे मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत करतात.
हळदीचे दूध, आले-मधाचे मिश्रण व तुळशीचे पाणी मुलांना दिल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मल्टीविटामिन्स, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे देती येतील.