कोणतीही अट न ठेवता प्रेम करणे, कोणत्याही हेतूशिवाय बोलणे, कोणत्याही हेतूशिवाय मदत करणे आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करणे हि खऱ्या प्रेमाची लक्षणे आहेत.
शाश्वत प्रेम हे अध्यात्मिक असते. असं प्रेम जर एखाद्या व्यक्तीला झालं तर त्यांच्यात कधीच भांडण होत नाहीत.
आपल्याला प्रेमाला समजून घ्यायचं असेल तर डोळ्यांचा उपयोग करू नका. आपण आंतरिक मनाने प्रेम करायला हवं, तेच आपलं प्रेम चिरकाल टिकवायला कामी येत.
एखादा व्यक्ती कोणाशीही जोडलेला नसेल तर तो चांगलं प्रेम करू शकतो कारण त्याच प्रेम पवित्र आणि स्वर्गीय असत.
जे काही करायचे असेल ते करा पण अहंकारी राहू नका. वासना महत्वाची नाही इर्षेने तर प्रेम, करुणा, विनम्रता आणि भक्ती भरलेली असते.