अस म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा सर्वात मोठा हात असतो. सुधा मूर्ती यांनी त्यांचा नवरा नारायण मूर्ती यांचा सपोर्ट केला होता.
इन्फोसिस सुरु करायच्या आधी सुधा मूर्ती यांनी लेखिका, शिक्षिका आणि समाजसेविका अशा अनेक रोलमध्ये काम केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की, मॅरेज लाईफ कस सांभाळून ठेवू शकतो.
सुधा मूर्ती यांनी आनंदी लग्नानंतरच आयुष्य व्यतीत केलं. त्यांनी तरुण मुलांना लग्नाच्या बाबतीत काही टिप्स दिल्या होत्या, त्या जाणून घ्यायला हव्या.
सुधा मूर्ती यांनी सांगितलं आहे की, आपण लग्न झाल्यानंतर भांडण करायला सुरुवात करतो. आपण जर भांडण केले नसतील तर आपण नवरा बायको असू शकत नाही.
आयुष्य हे देणं आणि घेणं असत. कोणतच आयुष्य हे परफेक्ट आयुष्य नसून कोणतंच कपल हे परफेक्ट नसत. प्रत्येक कपल हे प्लस आणि मायनस घेऊनच येत असत.
आपण जेव्हा भांडण करतो तेव्हा एक व्यक्ती नाराज होतो त्यावेळी दुसऱ्यानं शांत राहायला हवं. त्यावेळी एखाद्यानं तोंड उघडू नये.
सुधा मूर्ती यांनी सांगितलं आहे की, कपलने एकमेकांची मदत करायला हवी. पुरुषांनी महिलांकडून सगळे काम करावेत अशी इच्छा व्यक्त करू नये, त्याऐवजी एकत्र काम करायला हवं.