Saree Designs: सौंदर्य खुलवणारे साडीचे हे ट्रेंडी डिझाईन्स नक्की पाहा
Lifestyle Nov 29 2026
Author: Karishma R Image Credits:TheKoskii
Marathi
टील ग्रीन बांधनी चेक्स साडी
टील ग्रीन साडीवरील सोनेरी चौकटी, बांधनी डिझाईन आणि फिकट गुलाबी रंगाची एम्ब्रॉयडरी बॉर्डर खूप आकर्षक दिसते. स्लीव्हलेस व्ही-नेक ब्लाऊजसोबत नेसल्यास तुम्हाला एकदम फ्युजन लूक मिळेल.
Image credits: TheKoskii
Marathi
राणी पिंक बनारसी सिल्क साडी
गडद गुलाबी रंगाच्या बनारसी साडीवरील सोनेरी जरीची ब्रोक्रेड डिझाईन पारंपारिक सौंदर्य वाढवते. सण आणि लग्न समारंभात ज्यांना ग्रांड दिसायचं आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Image credits: TheKoskii
Marathi
मरून शीयर एम्ब्रॉयडरी साडी
गडद मरून रंगाच्या साडीवर असलेली छोटी बुटी वर्क आणि नाजूक एम्ब्रॉयडरी बॉर्डर यामुळे खूप एलिगंट लूक मिळतो. कॉकटेल पार्टीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे.
Image credits: TheKoskii
Marathi
पेस्टल पिंक सिक्विन वर्क साडी
फिकट गुलाबी रंगाच्या साडीवर चमकणारे सिल्व्हर सिक्विन, बीड्स एम्ब्रॉयडरी आणि स्कॅलप बॉर्डर खूपच नाजूक दिसते. लग्नात किंवा रिसेप्शनला ही साडी तुम्हाला क्लासी आणि ग्लॅमरस लूक देईल.
Image credits: TheKoskii
Marathi
जरी वर्क साडी
क्रश्ड सिल्क साडीवरील सोनेरी फुलांचे मोटिफ्स आणि हेवी बॉर्डरला कॉन्ट्रास्ट टील ब्लाऊजमुळे अधिकच सुंदर दिसते. लग्न आणि खास समारंभांमध्ये ही साडी रॉयल आणि ग्रेसफुल लूक देते.
Image credits: TheKoskii
Marathi
स्काय-ब्लू फ्लोरल ऑर्गनझा साडी
पांढऱ्या आणि निळ्या शेड्समध्ये असलेल्या या साडीवरील सुंदर फ्लोरल प्रिंट्स आणि स्कॅलप लेस बॉर्डर खूप फ्रेश दिसते. स्लीव्हलेस ब्लाऊजसोबत ही साडी अतिशय ट्रेंडी वाटते.
Image credits: TheKoskii
Marathi
पिवळी - पर्पल कॉन्ट्रास्ट सिल्क साडी
पिवळ्या रंगाच्या सिल्क साडीला गडद पर्पल रंगाची जरी बॉर्डर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जोडल्याने एक रॉयल लूक मिळतो. शुभकार्यात उठून दिसण्यासाठी हे कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे.
Image credits: TheKoskii
Marathi
पांढरी - पिंक बॉर्डर सिल्क साडी
शुद्ध पांढऱ्या रंगाच्या सिल्क साडीला गुलाबी रंगाची फ्लोरल एम्ब्रॉयडरी बॉर्डर आणि राणी पिंक ब्लाऊज खूपच शोभून दिसतो. हा एक एव्हरग्रीन आणि क्लासिक लूक देतो.