मकरसंक्रांती आली जवळ, तिळाचे लाडू बनवण्याची प्रक्रिया जाणून घ्या
Lifestyle Dec 28 2024
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
मकरसंक्रातीला तिळगुळ वाटप केलं जात
मकरसंक्रांती सणाला दरवर्षी मोठे लोक लहानांना तिळगुळ देऊन गोड बोला असं सांगत असतात. यादिवशी तिळाचे पदार्थ खाण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आली आहे.
Image credits: freepik
Marathi
साहित्य
तिळ – 1 कप
गूळ (चिरलेला) – 3/4 कप
शेंगदाणे – 1/4 कप
तूप – 1 टेबलस्पून
वेलची पूड – 1/4 टीस्पून
Image credits: pexels
Marathi
सर्वात आधी तीळ भाजून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा
एका कोरड्या कढईत मध्यम आचेवर तिळ टाकून हलके सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. भाजलेले तिळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
Image credits: pexels
Marathi
नंतर शेंगदाणे भाजून घ्या
शेंगदाणेदेखील कढईत भाजून त्यांची सालं काढा आणि थोडे थोडे कुटून ठेवा.
Image credits: freepik
Marathi
गूळ वितळून चिकटसर होईपर्यंत वाट पहा
कढईत तूप गरम करून त्यात गूळ टाका. गूळ वितळून एकसंध होईपर्यंत हलवत राहा. (थोडं पाणी टाकल्यास गूळ नीट वितळतो.) गुळाचा थोडासा चाचणीसाठी थंड करून चिकटसर होतो का ते बघा.
Image credits: freepik
Marathi
सर्व साहित्य एकत्र करून लाडू बनवा
आता वितळलेल्या गुळामध्ये भाजलेले तिळ, शेंगदाणे, आणि वेलची पूड घाला. गॅस बंद करून मिश्रण नीट एकत्र करा. नंतर हाताला तूप लावून लाडू वळून घ्या.