उन्हाळ्याच्या दिवसातील कडक ऊन आणि अंगाची होणारी ल्हाईल्हाईमुळे सर्वजण हैराण होतात. यावेळी शरीराला थंडावा मिळण्यासाठी काही ड्रिंक्सचे सेवन करू शकता.
लिंबू पाणी उन्हाळ्याच्या दिवसात सर्वाधिक प्रमाणात प्यायले जाते. यामध्ये मध, काळ मीठ आणि बर्फाचा वापर करा.
नैसर्गिक आणि हेल्दी ड्रिंक म्हणून नारळाचे पाणी बेस्ट पर्याय आहे. यामुळे शरीर हाइड्रेट राहण्यास मदत होईल.
उन्हाळ्याच्या दिवसात कैरीपासून तयार करण्यात आलेले आंबट-गोड पन्हे पिऊ शकता. यामुळे शरीराला थंडावा मिळेल.
उन्हाळ्याच्या दिवसात ताकाचे सेवन करू शकता. यामध्ये काळ मीठ, कोथिंबीरचा वापर करा.
उन्हाळ्याच्या दिवसात सत्तूपासून तयार करण्यात आलेले ड्रिंक पिऊ शकता. यासाठी सत्तूच्या पीठामध्ये थंड पाणी मिक्स करुन त्यामध्ये लिंबू, काळ मीठ आणि भाजलेले जीरे घालून प्या.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.