महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. याशिवाय बहुतांशजण उपवासही ठेवतात. या उपवासावेळी काय खाऊ शकता हे पुढे जाणून घेऊया.
उपवासावेळी साबुदाण्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खाऊ शकता. जसे की, साबुदाणा खिचडी, वडा किंवा खीर.
उपवासावेळी रताळे खाणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीराला उर्जाही मिळते.
महाशिवरात्रीच्या उपवासावेळी तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये बटाट्याचा वापर करू शकता. यावेळी सैंधव मीठचा वापर करा.
शिंगाड्याच्या पीठापासून तयार करण्यात आलेले पदार्थ तयार करू शकता. उपवासावेळी शिंगाड्याचे पीठ आणि किसलेला भोपळा वापरुन हलवा तयार करू शकता.
महाशिवरात्रीच्या उपवासावेळी ड्राय फ्रुट्सचे सेवन करू शकता. यामध्ये काजू, बदाम, मनुकाचे सेवन करू शकता.
उपवासावेळी फळ खाणे बेस्ट पर्याय आहे. यामध्ये सफरचंद, केळ, पेरू किंवा डाळींबाचे सेवन करू शकता.