पालकमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के आणि लोह अशी पोषण तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यासह शरीरातील होमग्लोबिन वाढण्यास मदत होते.
पालकाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने यापासून कोणत्या रेसिपी तयार करू शकता हे पुढे पाहू.
रात्रीच्या जेवणावेळी पालक पुरी तयार करू शकता. यासाठी गव्हाच्या पीठामध्ये मिक्सरमध्ये वाटलेल्या पालकाची प्युरी घालून पुऱ्या तयार करा.
पालक आणि पनीर याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या रेसिपीसाठी पालकाच्या प्युरीमध्ये शॅलो फ्राय केलेले पनीरचे तुकडे घालून भाजी तयार करा.
मुलांच्या डब्याला किंवा नाश्तासाठी पालक पराठा तयार करू शकता.
पालक टिक्की तयार करण्यासाठी पालक प्युरी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, धणे-जीरे पूड, तांदळाचे पीठ, बेसन आणि मीठ एकत्रित करुन त्याचे लहान आकारत गोळे तयार करा.
जेवणासाठी हेल्दी अशी रेसिपी डाळ पालक तयार करू शकता. यावेळी डाळीमध्ये पालक मिक्स करा.