सध्याच्या बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे बहुतांशजणांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. अशातच वजन कमी ते सडपातळ कंबरेसाठी कोणत्या गोष्टी कराव्यात याबद्दल जाणून घेऊया पुढे...
दालचिनीची चहा बॉडी डिटॉक्स करण्यासाठी उत्तम ड्रिंक आहे. याच्या सेवनीने शरिरात जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होते.
मेथी दाण्यांचे पाणी प्यायल्याने आठवड्याभरात सडपातळ कंबर नक्कीच मिळेल. मेथी दाण्यांमधील फायबर वजन कमी करण्यास मदत करतात.
सडपातळ कंबरेसाठी आणि टोन बॉडीसाठी दररोज सकाळी उपाशी पोटी बीटाचे सेवन करा. यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोट खूप वेळ भरलेले राहते. याशिवाय वजन कमी होण्यास मदत होते.
दररोज सकाळी 15-20 मिनिटे चालण्यास जावे. याशिवाय जेवल्यानंतरही शतपावली करावी.
वजन कमी करण्यासह सडपातळ कंबरेसाठी गोड पदार्थांचे सेवन करणे टाळा. गोड पदार्थांमध्ये उच्च प्रमाणात कॅलरीज असल्याने वजन अधिक वाढले जाऊ शकते.
ग्रीन टी प्यायल्याने शरिरातील मेटाबॉलिज्मचा वेग वाढला जातो. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी चे सेवन केल्याने शरिराची चरबी कमी होण्यासह पोट स्वच्छ राहिल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.