वास्तुशास्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते.
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबद्दलही वास्तुशास्रात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यानुसार काही उपाय केल्यास नक्कीच आर्थिक स्थिती सुधारली जाऊ शकते.
घराच्या मुख्यप्रवेशद्वार अस्वच्छ किंवा त्याच्या आजूबाजूला कचरा नसावा. यामुळे देवी लक्ष्मी आलेल्या पावलांनी परत मागे फिरते. यामुळे घराचा मुख्यप्रवेशद्वार स्वच्छ असावा.
काहीजण घराच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ चप्पल-शूज काढतात. असे करणे अशुभ मानले जाते.
मुख्यप्रवेशद्वारावर मनी प्लांटसारखी वेलींची रोपे लावू नये. यामुळे आर्थिक स्थिती बिघडली जाऊ शकते. या प्रकारची रोपे नेहमीच घराच्या आतमध्ये लावावीत.
मुख्यप्रवेशद्वारावर कधीच काटेरी रोप लावू नयेत. या रोपांमुळे घरात नकारात्मक उर्जा येण्यासह आर्थिक स्थितीवर बिघडली जाते.
घराच्या मुख्यप्रवेशद्वारावर अस्वच्छता किंवा अंधार नसावा. यामुळे समाजात अपमान सहन करावा लागू शकतो.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.