मोजे न घालता फक्त शूज घातल्याने पायांचा घाम साचून बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे पायांना दुर्गंधी येते.
पायांच्या ओलसरपणामुळे बुरशी वाढते. यामुळे अॅथलीट फूट सारखे संसर्गजन्य आजार होतात. याशिवाय खाज सुटणे, फोड येणे असेही होते.
मोजे न घालता शूज घातल्याने टाच आणि पायांच्या बोटांना फोड येतात.
घाम शूजवर पडल्याने त्यांचे आतील भाग लवकर खराब होतो. त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी होते.
ओलसरपणा आणि घर्षणामुळे त्वचा घट्ट होऊन काळी पडते. कालांतराने यामुळे वेदनाही होतात.
मोजे घामापासून आणि धुळीपासून पायांचे संरक्षण करतात. मोजे न घातल्यास पाय घाण होतात आणि बॅक्टेरिया जमा होतात.
मधुमेहींना पायांना जखमा, फोड असतात. अशांनी कधीही मोजे न घालता शूज घालू नयेत.
उत्तम झोपेसाठी दररोज खा भिजवलेली वेलची, वाचा फायदे
चेहऱ्यावर येईल ग्लो, असा तयार करा टोमॅटो फेस पॅक
१० मिनिटांत नाकावरील व्हाइटहेड्स कसे काढायचे?
तुम्हाला खाल्ल्यानंतरही भूक लागते? वाचा यामागील कारणे