आश्विन महिन्यातील नवमीला नवरात्री म्हटले जाते. यावेळी ३ ते ११ ऑक्टोबरच्या दरम्यान नवरात्र साजरी केली जाणार आहे. यावेळी देवीची वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजा केली जाते.
अष्टमी आणि नवमी या दोन दिवसांच्या मुहूर्तावर भक्त आपल्या कुलदेवीची पूजा करतात. कन्या पूजा करण्यासाठी ही चांगली तिथी असल्याचं सांगण्यात आलं आहे.
नवरात्रीच्या अष्टमी तिथीच्या वेळी देवी महागौरी आणि नवमी तिथीच्या वेळी देवी सिध्दिदात्री यांची पूजा केली जाते. नवमीच्या वेळी देवी सिध्दिदात्री यांची पूजा केली जाते.
अष्टमी तिथी ही १० ऑक्टोबर गुरुवार दुपार १२ वाजून ३२ मिनिटांनी सुरु होणार असून शुक्रवार ११ ऑक्टोबर दुपारी १२ वाजून ७ मिनिटांपर्यंत राहणार आहे.
नवमी तिथी ही ११ ऑक्टोबर शुक्रवार दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी सुरु होणार असून १२ ऑक्टोबर सकाळी १० वाजून ५८ मिनिटांपर्यंत राहणार आहे.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पंडित प्रवीण द्विवेदी यांच्या म्हणण्यानुसार ११ ऑक्टोबर शुक्रवार सकाळी अष्टमी आणि संध्याकाळी नवमीची तिथी चांगली राहणार आहे. यावेळी दोनही तिथींची पूजा करावी.
अष्टमी आणि नवमी एकाच वेळी आल्यावर दोघींची पूजा करावी. ११ ऑक्टोबर रोजी आपण या दोन्हींची पूजा करू शकता.