महाभारताबाबत असं सांगण्यात आलं आहे की त्याला घरात ठेवू नये. यामागचे कारण कोणीच जाणून घेत नाही. याबाबतची माहिती शंकराचार्यांनी दिली आहे.
शंकराचार्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, या व्हिडिओमधून ते लोकांच्या प्रश्नांचे उत्तर देताना दिसून येतात.
शंकराचार्यांना एका व्यक्तीं महाभारताबाबतचा प्रश्न विचारला होता. त्यांना भक्ताने विचारताना महाभारत घरात ठेवावं की नाही असा प्रश्न विचारला होता./
शंकराचार्यांच्या म्हणण्यानुसार ग्रंथांमध्ये सनातन धर्माचे ज्ञान लपलं आहे. सनातनी लोकांचं लक्ष विचलित होईल म्हणून ग्रंथांमध्ये अशा प्रकारचे गैरसमज निर्माण करण्यात आले.
काही लोकांनी महाभारत घरात ठेवणं चांगलं नसत अशा प्रकारचे गैरसमज समाजात पसरवले आहेत. त्याला कोणतीही मान्यता नसल्याचं शंकराचार्यांनी सांगितलं आहे.
महाभारतात सनातनी धर्माबद्दलची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या ग्रंथाला घरात ठेवण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचं महाराजांनी सांगितलं आहे.