शाहरुख या कारणास्तव रुग्णालयात दाखल, उन्हाळ्यात तुम्हीही घ्या काळजी
Lifestyle May 23 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
अहमदाबादमधील रुग्णालयात दाखल
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर KKR विरुद्ध SRH मध्ये सामना पार पडत होता. याचवेळी शाहरुख खान याची प्रकृती बिडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Image credits: Social Media
Marathi
मुलांसोबत क्रिकेटचा सामना पाहत होता
असे सांगितले जातेय की, शाहरुख सुहाना, अब्राहम आणि काहीजणांसोबत बसून क्रिकेटचा सामना पाहत होता. त्यावेळी बैचेन होण्यासह हिट स्ट्रोकची समस्या उद्भवली गेली.
Image credits: Instagram
Marathi
डिहाइड्रेशनची उद्भवली समस्या
न्यूज18 सोबत संवाद साधताना जुही चावलाने म्हटले की, शाहरुख खानला डिहाइड्रेशनची समस्या उद्भवली. याशिवाय खोकल्याचा त्रासही होत होता. सध्या अभिनेत्याची प्रकृती ठिक आहे.
Image credits: Instagram
Marathi
डिहाइड्रेशन म्हणजे काय?
शरिरात पाण्याची कमतरता निर्माण होते त्यावेळी डिहाइड्रेशनची समस्या उद्भवली जाते. यावेळी उलटी होणे, शरिरातून अत्याधिक घाम निघणे अशा काही समस्याही सुरू होतात.
Image credits: Freepik
Marathi
डिहाइड्रेशनची लक्षणे
अधिक तहान लागणे, लघवी न होणे, थकवा जाणवणे, डोके दुखणे, चक्कर येणे, त्वचा कोरडी होणे आणि तोंड सुकणे अशी लक्षणे डिहाइड्रेशनची दिसून येतात.
Image credits: Getty
Marathi
डिहाइड्रेशनपासून असा करा बचाव
उन्हाळ्याच्या दिवसात डिहाइड्रेशनची समस्या अधिक होते. दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी, फळांचा ज्यूस, रसाळ फळांचे सेवन करावे. तेलकट आणि तिखट पदार्थ खाणे टाळावे.
Image credits: Pixabay
Marathi
कडाक्याच्या उन्हात घराबाहेर जाणे टाळा
कडाक्याच्या उन्हात घराबाहेर जाणे टाळले पाहिजे. अथवा घराबाहेर पडणार असल्यास छत्री किंवा संपूर्ण अंगभर कपडे परिधान करून निघावे.