द्वेष द्वेषाने नाहीसा होऊ शकत नाही. तर प्रेमानेच तो नष्ट केला जाऊ शकतो, जे एक नैसर्गिक सत्य आहे.
जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे.
आरोग्याशिवाय जगणं, जगणं नाही. ती फक्त वेदनांची अवस्था आहे, मृत्यूची प्रतिमा आहे.
तुमच्याकडे जे काही आहे, त्याचा बडेजाव करू नका. इतरांचा मत्सर करू नका.
अज्ञानी व्यक्ती एखाद्या बैलाप्रमाणे असतो. तो ज्ञानाने नाही तर आकाराने वाढतो.
मनच सर्वकाही आहे, तुमची जसा विचार करता तसेच बनता.
निघून गेलेल्या काळात ध्यान केंद्रित करू नये. भविष्यासाठी स्वप्न पाहू नयेत तर बुद्धीचा वापर वर्तमानात केंद्रित करावा.
भविष्याची स्वप्ने बघताना त्यात अडकू नका त्यावर विचार करा. भूतकाळाची आठवण करुन पश्चाताप करण्यापेक्षा वर्तमानात आनंदी राहाण्याचा प्रयत्न करा.
ज्या क्षणांपासून तुम्ही स्वत:वर प्रेम करायला शिकाल तेव्हापासून तुम्ही कधीही कोणाला दुखावू शकत नाही.
मनाची शांतता ही आतमध्ये असते, बाहेर शोधण्याचा प्रयत्न करु नका.