गणेशोत्सवाची धूम गोव्यातही दिसते. गणपतीला निरोप देण्याची एक वेगळी परंपरा गोव्यात असून त्याला सांगोड उत्सव असे म्हटले जाते.
कुंभारजुवे गावात जवळपास 200 वर्षांपासून चालू असलेला 'सांगोड उत्सव' साजरा केला जातो. यावेळी सात दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जातो.
सांगोड म्हणजे दोन होड्या तयार करुन त्यावर लाकडाच्या फळ्या ठेवत तयार केलेला तराफा. तराफ्याला सुंदर सजावट केली जाते.
सांगोडवर गोव्यातील शांतादुर्गा मंदिरातील गणपतीची मुर्ती ठेवली जाते. या उत्सवात स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
सांगोडवर सजीव पौराणिक कथांवर आधारित देखावे उभारले जातात.
नदीच्या पात्रात सांडोच्या माध्यमातून सात फेऱ्या मारुन झाल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.