हुंडा घेणे योग्य की अयोग्य? जाणुन घ्या प्रेमानंद महाराजांचे उत्तर
Lifestyle Dec 29 2024
Author: Jagdish Bobade Image Credits:facebook
Marathi
हुंडा न देणे हे पाप आहे का?
प्रेमानंद महाराजांना एका भक्ताने विचारले, 'मुलीच्या लग्नात हुंडा न दिल्याने काही पाप होईल का? भक्ताचे म्हणणे ऐकून बाबा काय म्हणाले हे जाणुन घेऊया...
Image credits: facebook
Marathi
हुंडा मागणे ही चुकीची परंपरा आहे
प्रेमानंद महाराज म्हणाले, ‘वराच्या बाजूचे लोक हुंड्याची मागणी करत असतील तर ते चुकीचे आहे. मुलीचे आई-वडील आणि कुटुंबीयांनी स्वत:च्या इच्छेने काही दिले तर त्यात काही गैर नाही.’
Image credits: facebook
Marathi
सूनेपेक्षा मोठी संपत्ती नाही
प्रेमानंद महाराज म्हणाले, ‘योग्य सून मिळाली तर यापेक्षा मोठी संपत्ती नाही. वराच्या बाजूने पैशाची मागणी करणे कोणत्याही प्रकारे योग्य नाही, हे शास्त्राच्या विरुद्धही आहे.’
Image credits: facebook
Marathi
हुंडा ही वाईट प्रथा आहे
प्रेमानंद महाराजांच्या म्हणण्यानुसार, 'अयोग्य हुंडा व्यवहार अत्यंत धोकादायक आहे. ही एक वाईट प्रथा मानली पाहिजे. हे केवळ हानिकारकच नाही तर मुलींचा अनादरही आहे
Image credits: facebook
Marathi
सुनेशी गैरवर्तन करू नका
प्रेमानंद महाराजांच्या मते, 'काही दुष्ट लोक हुंड्यासाठी सुनेचा छळ करतात. जी मुलगी तुमच्या घरी आली आहे ती पण कुणाची तरी पोर आहे. तिच्याशी वाईट वागू नका.'
Image credits: facebook
Marathi
सुनेमुळे वंश वाढेल
प्रेमानंद महाराजांच्या मते, 'जी मुलगी तुमच्या घरी सून म्हणून आली आहे, तिच्यामुळे तुमचा वंश वाढेल. म्हणूनच ती पूज्य आहे. सून जर घर सांभाळत असेल तर यापेक्षा मोठी उपलब्धी कोणती?
Image credits: facebook
Marathi
हुंड्याची वाईट प्रथा टाळली पाहिजे
प्रेमानंद महाराजांच्या मते, 'म्हणून जे लोक हुंडा म्हणून अवास्तव पैशाची मागणी करतात त्यांनी ते टाळावे. मुलीकडचे जे स्वखुशीने देतील ते आपण स्वीकारले पाहिजे.