फिल्टर कॉफी बनवण्यासाठी खास दाक्षिणात्य पद्धतीचा उपयोग केला जातो. यासाठी तुम्हाला फिल्टर कॉफी पावडर आणि दक्षिण भारतात वापरला जाणारा कॉफी फिल्टर लागतो.
फिल्टर कॉफी पावडर - 2 चमचे, गरम पाणी - ½ कप, दूध - 1 कप, साखर - चवीनुसार
फिल्टरच्या वरच्या भागात दोन चमचे पावडर टाका. त्यानंतर अर्धा कप उकळलेले पाणी सावकाश पावडरवर टाका. त्यानंतर फिल्टरचे झाकण लावून १० ते १५ मिनिट वाट पहा.
आता एका पातेल्यात दूध गरम करून घ्या. एका कपात 2-3 चमचे डिकॉक्शन म्हणजेच आधी गरम केलेली कॉफी टाका. गरम दूध आणि साखर घालून हलवा.
गरमागरम सर्व्ह करा आणि दक्षिण भारतात मिळणाऱ्या स्टीलच्या कप-तंबलामध्ये दिल्यास अधिक पारंपरिक वाटेल.
Chanakya Niti: नवीन वर्षात नवरा आणि बायकोच नातं कस टिकवावं?
New Year: नवीन वर्षाला प्लम केक कसा बनवावा, रेसिपी जाणून घ्या
शेवग्याचे झाड घराच्या अंगणात कसे लावायचे?, जाणून घ्या सोप्या टिप्स
मनमोहन सिंग यांच्या तीन मुली उपिंदर, दमन आणि अमृत काय करतात?