Prajakta Mali सारख्या नेसा या 8 हटके साड्या, चारचौघात होईल लूकची चर्चा
Lifestyle Dec 03 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
सिल्क साडी विथ फुल हँड ब्लाऊज
प्राजक्ता माळीसारखी प्युअर सिल्क साडी नेसून त्यावर कॉन्ट्रास्ट रंगातील फुल हँड ब्लाऊज ट्राय करू शकता. याशिवाय मिनिमल मेकअप आणि चोकर ज्वेलरीने लूक पूर्ण करा.
Image credits: Instagram
Marathi
पारंपारिक लूक
पैठणी किंवा सेमी पैठणी साडी लग्नसोहळ्यावेळी हमखास नेसली जाते. यावरही प्राजक्ता माळीने कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज ट्राय केले आहे. यावर मोत्याची ज्वेलरी फार सुंदर दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
ड्युअल शेड्स साडी
लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी प्राजक्ता माळीसारखी गुलाबी आणि नारंगी रंगातील ड्युअल शेड्स साडी नेसू शकता. यावर गोल्डन ज्वेलरी छान दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
हँड वर्क शिफॉन साडी
मेंदी सेरेमनीसाठी प्राजक्ता माळीसारखी पर्पल रंगातील हँड वर्क करण्यात आलेली शिफॉन साडी नेसू शकता. प्राजक्ताने साडीवर चोकर ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे.
Image credits: Instagram
Marathi
हॉल्टर नेक ब्लाऊज विथ सिल्क शिफॉन साडी
चारचौघात वेगळे दिसण्यासाठी लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनला हॉल्टर नेक ब्लाऊज विथ सिल्क शिफॉन साडी नेसू शकता.
Image credits: Instagram
Marathi
शिमर साडी
संगीत नाइटसाठी प्राजक्ता माळीसारखी सिल्व्हर रंगातील शिमर साडी परफेक्ट आहे.
Image credits: Instagram
Marathi
रेडी टू वेअर साडी
संगीत किंवा मेंदी सेरेमनीसाठी प्राजक्ता माळीसारखी गुलाबी रंगातील रेडी टू वेअर साडी नेसू शकता. यावर मिनिमल मेकअप आणि हेव्ही झुमके घालून लूक पूर्ण करा.