पपईमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, ई सह कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडेंट्स अशी पोषण तत्त्वे असतात. यामुळे आरोग्याला फायदा होतो.
नाश्तामध्ये पपईचे सेवन केल्याने आरोग्यासंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. जाणून घेऊया पपई खाण्याचे फायदे...
पपईमध्ये पपॅन नावाचे एंजाइम असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
पपईमध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि अन्य पोषण तत्त्वे असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. याशिवाय सर्दी, खोकल्याचा त्रास दूर होते.
पपईमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट्स त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
वजन कमी करायचे असल्यास पपई नाश्तामध्ये खाऊ शकता. यामध्ये कॅलरीज कमी असून फायबर उच्च प्रमाणात असतात.
पपई हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. यामधील अँटीऑक्सिडेंट्स आणि पोटॅशियम हृदयाचे ठोके सामान्यपणे क्रिया करण्यास मदत करतात.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.