डोक्यातील पांढरा कोंडा आणि खाज यामुळे तुम्ही त्रस्त आहात का? फक्त १ चमचा लिंबाच्या रसाने कोंडा कसा गायब होईल?
कोरडी त्वचा, खाज आणि खांद्यावर पडणारा पांढरा कोंडा यामुळे चारचौघात लाजिरवाणे वाटते का? महागडे केमिकल शॅम्पू सोडून हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा.
लिंबामध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि अँटी-फंगल गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. हे डोक्याच्या त्वचेवरील (Scalp) फंगस आणि डेड स्किन मुळापासून नष्ट करते.
१ चमचा ताज्या लिंबाच्या रसामध्ये २ चमचे शुद्ध खोबरेल तेल मिसळून चांगले एकत्र करा. खोबरेल तेल केसांना मॉइश्चरायझर देते.
कापसाच्या मदतीने हे मिश्रण केसांच्या मुळांना लावून हलक्या हाताने मसाज करा. फक्त ३० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर सौम्य (Mild) शॅम्पूने केस धुवा.
आठवड्यातून १ ते २ वेळा ही सोपी ट्रिक फॉलो केल्यास, कोंडा पूर्णपणे गायब होईल आणि केस नैसर्गिकरित्या चमकदार होतील!
Warm Water : जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्यास काय होते माहितीये का?
Breastfeeding Diet : स्तनदा मातांनी आहारात नक्की घ्यावेत हे ७ पदार्थ
रताळे, दूध आणि गूळ एकत्र खाण्याचे हे भन्नाट फायदे माहीत आहेत का?
शरीरातील व्हिटॅमिन सी ची कमतरता भरून काढण्यासाठी खा हे ७ पदार्थ