नाशिकमधील फेसम 4 झणझणीत मिसळ, लाल-काळ्या रस्साने मन होईल तृप्त!
Lifestyle Feb 09 2025
Author: Rameshwar Gavhane Image Credits:social media
Marathi
मिसळ म्हटलं की सर्वांचीच तोंडाला पाणी सुटतं!
नाशिकमधील मिसळ जगभरात प्रसिद्ध आहे. शहरात झणझणीत मिसळांमध्ये लाल, काळ्या रस्साची चव वेगळीच आहे. चला तर मग, नाशिकमधील सर्वात फेमस ४ मिसळ जाणून घेऊया!
Image credits: fb
Marathi
साधना मिसळ
साधना मिसळ म्हणजे अस्सल चुलीवरची झणझणीत लाल-काळ्या रस्साची मिसळ. या मिसळचा अनुभव घेण्यासाठी हजेरी लावणाऱ्या खवय्यांची संख्या जास्त असते.
Image credits: fb
Marathi
ग्रेस एम्बसी मिसळ
निसर्गरम्य वातावरणात, द्राक्ष बागेच्या मध्यवर्ती असलेल्या ग्रेप एम्बसी मिसळचा आस्वाद घेतल्यावर खवय्यांना एक वेगळीच ऊर्जा मिळते. सुंदर वातावरण आणि स्वादिष्ट मिसळचा अनुभव एकत्र मिळतो
Image credits: social media
Marathi
श्री सोमनाथ मिसळ
येथील मिसळीचं विशेष आकर्षण म्हणजे घरगुती मसाले आणि झणझणीत जम्बो मिसळ. ही मिसळ खाण्यासाठी नेहमीच लांब रांगा असतात.
Image credits: social media
Marathi
सिताबाईची मिसळ
सिताबाईच्या मिसळीला 100 वर्षांची परंपरा आहे! चुलीवरची झणझणीत मिसळ आणि लाल रस्साने सजवलेली ही मिसळ खाण्याचा अनुभव तुम्ही विसरू शकणार नाही.
Image credits: social media
Marathi
नाशिकमध्ये मिसळ म्हणजे एक चविष्ट परंपरा!
नाशिकमधील या ४ प्रसिद्ध मिसळ ठिकाणी तुम्ही तृप्त होऊन जाऊ शकता. चला, मग आपल्या आवडीनुसार एका ठिकाणी भेट देऊन या झणझणीत मिसळीचा आनंद घ्या!