फ्रूट कस्टर्ड हा गोडसर आणि पौष्टिक पदार्थ आहे, जो सहज घरी बनवता येतो. उन्हाळ्यात थंडगार आणि चविष्ट पदार्थ म्हणून सर्वांना आवडतो.
Image credits: Pinterest
Marathi
साहित्य
१ लिटर दूध, ४ टेबलस्पून कस्टर्ड पावडर,१/२ कप साखर, १ कप मिक्स फ्रूट्स, १/४ टीस्पून वेलदोडा पावडर, बदाम, काजू आणि पिस्ते सजावटीसाठी
Image credits: Pinterest
Marathi
कस्टर्ड मिश्रण तयार करा
एका छोट्या वाडग्यात ४ टेबलस्पून कस्टर्ड पावडर घ्या. त्यात १/२ कप थंड दूध घालून चांगले मिसळा.
Image credits: Pinterest
Marathi
दूध गरम करा
एका भांड्यात १ लिटर दूध गरम करा. मंद आचेवर ठेवा. दूध थोडेसे गरम झाल्यावर त्यात साखर घालून मिसळा.
Image credits: Pinterest
Marathi
कस्टर्ड मिश्रण दुधात घाला
आता कस्टर्ड पावडरचे मिश्रण हळूहळू गरम दुधात टाका आणि सतत ढवळा. दूध घट्टसर होईपर्यंत (५-७ मिनिटे) मंद आचेवर ढवळत राहा. मिश्रण थोडे जाडसर झाले की गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.
Image credits: Pinterest
Marathi
फ्रूट्स मिसळा आणि सर्व्ह करा
थंड झाल्यावर त्यात चिरलेली फळं मिसळा आणि हलके ढवळा. कस्टर्ड १-२ तास फ्रीजमध्ये ठेवा. सजावटीसाठी काजू, बदाम आणि पिस्ते भुरभुरा.